राजकीय

राष्ट्रवादीची लढाई आता सुप्रीम कोर्टात

राष्ट्रवादीमधील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात गेला असून, यावर पहिली सुनावणी शुक्रवारी झाली. यानंतर आज पुन्हा निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. मात्र, आयोगातील सुनावणी आधीच शरद पवारांनी मोठी खेळी खेळत थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाकडूनही सुप्रीम कोर्टात ‘कॅव्हेट’ दाखल करण्यात आली आहे. तसेच, आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती सुप्रीम कोर्टाला करण्यात आली आहे. यावर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत अजितदादा पवार यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना द्याव्यात, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली. दरम्यान या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे, पण या आधीच अजितदादा गटानेही सुप्रीम कोर्टात धाव घेत ‘कॅव्हेट’ दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीची कायदेशीर लढाई आता सुप्रीम कोर्टाही सुरू झाली आहे.

Related Articles

Back to top button