देश - विदेश
ब्रेकिंग! पुन्हा एअरस्ट्राईक हल्ला
- मध्यपूर्वेतील अतिरेकी संघटना असलेल्या हमासने इस्त्रायलच्या अनेक शहरांवर रॉकेट हल्ले करत भूप्रदेश ताब्यात घेण्यात सुरुवात केली आहे. परिणामी रशिया-युक्रेन नंतर जगात आता आणखी एका युद्धाला तोंड फुटले आहे. इस्त्रायलच्या विविध शहरांवर जवळपास पाच हजारांहून अधिक रॉकेट दागल्याचा दावा हमासकडून करण्यात आला आहे. त्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्यामीन नेतन्याहू यांच्या सूचनेवरून पॅलेस्टिनवर एअरस्ट्राईक करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे पाचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आता इस्त्रायल-पॅलेस्टिनचा रक्त रंजित संघर्ष आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे.
हमासने इस्त्रालयवर केलेल्या हल्ल्यात अनेक अधिक इस्त्रायली नागरिक ठार झाले असून किमान १५०० लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर, इस्त्रायलने पॅलेस्टिनवर हवाई हल्ले केले असून त्यात पाचशे पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्त्रायलच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलच्या विविध भागांमध्ये सागरी, जमीन आणि हवेतून हल्ले केले असून अनेक प्रदेश ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. इस्त्रायली सैनिक आणि हमासच्या अतिरेक्यांमध्ये जोरदार चकमकी सुरू आहे. परिणामी दोन्ही देशातील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.