राजकीय

मोठी बातमी! शिंदे गटाने थेट भाजपला ललकारले

  1. अलीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यामुळे भाजपाला काहीही फरक पडणार नाही. राज्यात भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष आहे, असे विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी काल केले. दरम्यान त्यांच्या या विधानामुळे आता शिंदे गट आक्रमक झाला असून शिंदे गटाचे प्रवक्ते संजय सिरसाट यांनी भाजपाला अगदी थेट इशारा दिला आहे.
    भाजपा हा केंद्रात मोठा पक्ष आहे. मात्र, त्यांना इतर जणांची गरज आहे. तुम्हाला सर्व पक्षांचे सहकार्य हवे. मोठ्या नेत्यांनी असे बोलणे योग्य नाही, असे म्हणत सिरसाट यांनी यांचे कान टोचले आहेत. इतकेच नाही, तर तुम्हाला गर्व चढला असेल तर युती करू नका, असा इशाराही सिरसाट यांनी भाजपाला दिला आहे. सिरसाट यांनी बोलून दाखवलेल्या या नाराजीमुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे.

Related Articles

Back to top button