क्राईम

टेम्पोचा ब्रेक फेल झाला अन् विसर्जन मिरवणुकीत घुसला

सोलापूरसह राज्यात धुमधडाक्यात गणेश विसर्जन सुरू असताना गुहागरमधून धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये ब्रेक फेल टेम्पो गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसल्याची घटना घडली आहे.
काल सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर १५ जण जखमी झाले. गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर गावात ही घटना घडली आहे. या गावात सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ब्रेक फेल टेम्पो विसर्जनाच्या मिरवणुकीत घुसला.
ब्रेक फेल टेम्पोमुळे गणेशभक्त जखमी झाले. मिरवणुकीतील या गणेशभक्तांपैकी दोघांचा मृत्यू झाला. दीपक भुवड (४८) आणि कोमल भुवड (१७) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत.

Related Articles

Back to top button