- भारताने आज पाकिस्तानमधील १२ शहरांवर ५० ड्रोन हल्ले केल्याची माहिती आहे. या घडामोडीनंतर आता केंद्र सरकार आणि राजस्थान सरकार अधिक सतर्क झाले आहे. राजस्थान सरकारच्या गृह विभागाने तातडीने एक सूचना जारी केली आहे. यात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाकिस्तानी हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे कठोर आदेश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत काय तयारी करायची, याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
- राज्याच्या गृह विभागाने सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना आपत्ती व्यवस्थापनाची संपूर्ण यंत्रणा अद्ययावत आणि तयार ठेवण्यास सांगितले आहे. गृह विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार शत्रू देशाने हल्ला केल्यास राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये जीवनावश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
- या महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही अत्यावश्यक सूचनांचा समावेश आहे. सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशाविरोधात भडकाऊ पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून वातावरण बिघडणार नाही.
ब्रेकिंग! भारत-पाकिस्तान तणाव, काहीही होऊ शकते, गृह विभागाकडून गाईडलाईन्स जारी
