- भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईक, त्यानंतर पाकिस्तानमध्ये सुरू झालेले ड्रोन हल्ले आणि आता आणखी एक संकट पाकिस्तानवर कोसळले आहे. भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान जागतिक मदतीकडे डोळे लावून बसला आहे. मात्र येथे पाकिस्तानला श्रीलंकेने मोठा दणका दिला आहे. श्रीलंकेने बाजी मारली आहे. वर्ल्ड बँकेने श्रीलंकेला एक अब्ज डॉलरची मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येथे आता पाकिस्तानचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानची प्रचंड कोंडी होण्याची शक्यता आहे.
- पाकिस्तानला उद्या वर्ल्ड बँकेकडून मदतीचा एक हफ्ता मिळणार होता, मात्र भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर ही मदत मिळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. पाकिस्तान वर्ल्ड बँक मदत करेल या भरोशावर बसला असतानाच दुसरीकडे श्रीलंकेच्या कुटनीतीचा मोठा विजय झाला आहे. पुढील तीन वर्षांमध्ये श्रीलंकेला तब्बल एक अब्ज डॉलरची मदत देण्याची घोषणा वर्ल्ड बँकेने केली आहे. यातून श्रीलंकेत रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधा उभारली आहे.
ब्रेकिंग! भारताच्या एअर स्ट्राईकनंतर आता श्रीलंकेने टाकला मोठा डाव
