- पाकिस्तानने काल रात्री भारताच्या अनेक सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाइल्सच्या मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांना हाणून पाडण्यात आले. पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
- काल झालेल्या गोळीबारात 16 निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. यापुढे पाकिस्तानचा दहशतवाद अजिबात खपवून घेतला जाणार नाही. त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. मागील 65 वर्षांत भारताने सिंधू पाणीवाटप करणे ही भारताची सहिष्णूता आहे. आता यापुढे मात्र भारत आपल्या हक्काचे पाणी वापरणार, असा इशारा भारतीय सैन्य आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून देण्यात आला.
- कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान स्थित अनेक ठिकाणांवर हल्ले केले. लाहोरमध्ये एक एअर डिफेन्स सिस्टिमही उद्धवस्त करण्यात आली आहे.
ब्रेकिंग! सुधारा… नाहीतर संपवून टाकू, भारताचा पाकिस्तानला शेवटचा इशारा
