देश - विदेश

ब्रेकिंग! जम्मूत पाकिस्तानचा ड्रोन अटॅक, सायरन वाजले

  • पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती सुरुच आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार जम्मूच्या विविध भागांत ड्रोनद्वारे हल्ला केला गेला आहे. जम्मूत काही ठिकाणी मोठा आवाज ऐकू आला. यानंतर येथे सॉयरन वाजू लागले. संपूर्ण जम्मूत ब्लॅकआऊट करण्यात आले. लोकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर जम्मूत एअर डिफेन्स सिस्टीम अॅक्टिव्ह करण्यात आली. जम्मूत पाच ते सहा स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगतिले जात आहे. ड्रोन किंवा मिसाइलद्वारे हल्ला करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
  • आकाशात ड्रोन दिसल्यानंतर जम्मूत अलर्ट जारी करण्यात आला. येथे अनेक ठिकाणी ड्रोनने हल्ले करण्यात आले. कुपवाडा भागात गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने ड्रोन पाडले आहेत. आरएसपोरा भागात पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात आले. या दरम्यान पाकिस्तानच्या एकूण आठ मिसाइल्स नष्ट करण्यात आल्या. पंजाब राज्यातील गुरदासपूर आणि अमृतसर मध्येही ब्लॅकआऊट करण्यात आले आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार पठानकोट एअरबेस परिसरात सायरन वाजत आहेत. हलका सुजानपूर भागात पाकिस्तानी ड्रोन दिसले आहेत. यानंतर भारतीय सैन्यावर या ड्रोन्सवर जोरदार फायरिंग सुरू केली. काल रात्री सुद्धा पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारताच्या एस 400 डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे सगळे ड्रोन आणि मिसाइल्स नष्ट केल्या.

Related Articles

Back to top button