राजकीय

छगन भुजबळ शरद पवारांना सतत ब्लॅकमेल करायचे

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांना तुरुंगवास सहन करावा लागला होता. तुरुंगात असतानना भुजबळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्लॅकमेल करायचे,असा खळबळजनक दावा माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. पंढरपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
कदम म्हणाले की, छगन भुजबळ जेलमधून नेहमी शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे. भुजबळांची जामिनासाठी धडपड सुरू होती. आपल्याला जामीन मिळाला नसल्यास मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देत भुजबळ पवारांना ब्लॅकमेल करत होते, असा दावा कदम यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button