मनोरंजन

ब्रेकिंग! ‘गदर २’ चा जवानला मोठा दणका

बॉक्स ऑफिसवर सध्या ‘जवान’ आणि ‘गदर २’ खूप धुमाकूळ घालत आहेत. तब्बल २२ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सनी देओल याचा ‘गदर २’ हा चित्रपट आता चांगलाच चर्चेत आला आहे. सनी आणि अमीषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेला ‘गदर २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर ‘जवान’, पठाण आणि ‘गदर २’मध्ये स्पर्धा सुरू आहे. ‘पठाण’ने २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली आहे.
मात्र, सनीचा चित्रपट ‘गदर २’ चित्रपट शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट ‘पठाण’चा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आले आहेत.
‘गदर २’ हा चित्रपट केवळ हिंदी भाषेत रिलीज झाला होता. शाहरुख खानच्या ‘पठान’ चित्रपटाने हिंदी भाषेत ५२४.५३ कोटींचा व्यवसाय केला होता. म्हणजे आता ‘गदर २’ या चित्रपटाला ‘पठाण’चा विक्रम मोडण्यासाठी अवघ्या २३ लाख रुपयांची गरज आहे. 
‘जवान’च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले, तर शाहरुखच्या या चित्रपटाने २१व्या दिवशी ५.१५ कोटींचा व्यवसाय केला आहे. मात्र, या सगळ्या वादळात ‘गदर २’ चांगलाच तग धरून राहिला आहे.

Related Articles

Back to top button