क्राईम
प्रेमात जात आडवी आली अन्…

- प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रियसीची हत्या केली, मुलीने आत्महत्या केली, अशा घटना आपण पाहिल्या आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगर येथे एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. दुसऱ्या जातीतील मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्यामुळे चुलत भावाने बहिणीचा काटा काढला आहे. त्याने बहिणीला डोंगरावरून खाली ढकलून देत खून केला.
- ऑनर किलिंगची ही घटना संभाजीनगरच्या तिसगाववळ खवड्या डोंगर परिसरात सोमवारी दुपारी घडली आहे. नम्रता गणेशराव शेरकर ( रा. शहागड, ता. अंबड, जि. जालना ) असे मृत तरूणीचे नाव आहे. ऋषिकेश तानाजीराव शेरकर ( २५, रा. वळदगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर ) असे आरोपी भावाचे नाव आहे.
- नम्रता ही बारावीत शिकत होती. तिचे शहागड येथील एका तरूणाशी प्रेम संबंध होते. तो दुसऱ्या जातीचा होता. काही दिवसांपूर्वी नम्रता प्रियकरासोबत दोन दिवस पळून गेलो होती. पण, वडिलांनी तिची समजूत काढण्यासाठी संभाजीनगरच्या वळदगाव येथे तिच्या सख्ख्या काकाकडे पाठवले होते. आठ दिवसांपासून ती काकाकडे राहत होती. तिची समजूत काढण्यात येती होती. मात्र, नम्रता ती त्या मुलास विसरू शकत नव्हती.
- तिच्या मनात काय चालू आहे, हे कुणालाही समजत नव्हते. त्यामुळे तिला समजवण्यासाठी ऋषिकेश पुण्यातून आला होता. सोमवारी ऋषिकेशने तिला ‘त्या मुलाचे तुझ्याशी बोलणे करून देतो,’ अशी थाप मारून तिला विश्वासात घेतले. भावाच्या शब्दांवर विश्वास ठेवून ती त्याच्यासोबत बाहेर जाण्यास तयार झाली.
- सोमवारी दुपारी घरातून बाहेर पडलेल्या ऋषिकेशने बाईक थेट खवड्या डोंगरच्या दिशेने घेतली. डोंगराच्या पायथ्याशी बाईक उभी करत, पुढे दोघे पायी गेले. यावेळी दोघांच्या संवादाचे काही वेळातच वादात रूपांतर झाले. डोंगरावर कोणाचा तरी वाद सुरू असल्याचे आवाज क्रिकेट खेळणाऱ्या काही तरूणांच्या लक्षात आले. अनेकांनी दोघांना डोंगराच्या दिशेने बाईकवरून जाताना बघितले होते.
- दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम करणाऱ्या बहिणीचा राग आल्याने शिवाय गेली अनेक दिवसांपासून सर्वजण समजावून सांगत असतानासुद्धा ती ऐकत नसल्याने तिला ठार मारण्यासाठी डोंगराच्या माथ्यावरून ऋषिकेशने नम्रताला धक्का दिला. डोंगरावरून पडल्याने नम्रताचा मृत्यू झाला. नम्रताला ढकलून दिल्यानंतर ऋषिकेश पळून जाताना तरूणांनी त्याला पकडून ठेवले.



