राजकीय
ब्रेकिंग! काँग्रेसला नवा झटका
महाविकास आघाडीची कामगिरी विधानसभा निवडणुकीत लाजीरवाणी राहिली. काँग्रेसला तर अवघ्या 16 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर पक्षात भाकरी फिरणार, अशी शक्यत वर्तवली जात होती. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरुण नेत्यांकडे पक्षाची जबाबदारी देण्याचे बोलले जात होते. मात्र तरुण नेत्यांचा प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार असल्याची माहिती मिळत आहे.
सतेज पाटील, अमित देशमुख आणि विश्वजीत कदम यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेण्यात रस नसल्याची माहिती आहे. आपल्याला सध्या हे पद नको असल्याचे त्यांनी पक्षातील वरिष्ठांना सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान, हायकमांडकडून विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रदेशाध्यक्ष पदाकरीता विचार केला जात आहे.