‘अश्लील’ आणि ‘असभ्य’

नंदामुरी बालकृष्ण आणि उर्वशी रौतेला यांचे ‘डाकू महाराज’ या चित्रपटातील ‘दाबिदी दिबिदी’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्यातल्या डान्समुळे बालकृष्ण आणि उर्वशी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत.
या गाण्याच्या कोरिओग्राफरवरही टीका होत आहे. गाण्यामध्ये अश्लील डान्स स्टेप्स असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. शेखर मास्टर यांनी हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. त्यांची ‘अश्लील’ कोरिओग्राफी पाहून लोकांनी या गाण्याला ‘क्रिंज’ म्हटले आहे. काही नेटीझन्सनी 64 वर्षीय बालकृष्ण आणि 30 वर्षांची उर्वशी यांच्यातल्या वयाच्या फरकावर भाष्य केले आहे.
तसेच विचित्र डान्स स्टेप असल्याचेही म्हटले आहे. एस थमन यांच्या ‘दाबिदी दिबिदी’ गाण्याच्या व्हिडिओत उर्वशी क्रॉप टॉप आणि स्कर्ट घालून नाचत असल्याचे दिसत आहे. तर बालकृष्ण नाचताना उर्वशीला हात लावत असल्याचे आणि ड्रेस ओढत असल्याचे दिसत आहे.



