मनोरंजन
ब्रेकिंग! अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक; चेंगराचेंगरीप्रकरणी घोषणाबाजी, तोडफोड
- अभिनेता अल्लू अर्जुन याचा ‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याचे प्रीमिअर हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी अल्लू अर्जुन स्वत: उपस्थित होता. त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती या महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान राज्यातून याचा विरोध दर्शविला जात आहे. रविवारी अल्लु अर्जुनच्या हैद्राबाद येथील घराच्या बाहेर लोकांनी आंदोलन पुकारले. आंदोलकांनी त्याच्या घराबाहेर तोडफोड केली. त्यांच्या घरावर टोमॅटोही फेकण्यात आले. उस्मानिया विश्वविद्यालयातील जेएसी कार्यकर्त्यांनी अल्लुच्या घराबाहेर आंदोलन केल्याची माहिती आहे.
- रविवारी अल्लु अर्जुनच्या हैद्राबाद येथील घराच्या बाहेर लोकांनी आंदोलन पुकारलं. आंदोलकांनी त्यांच्या घराबाहेर तोडफोड केली. त्यांच्या घरावर टोमॅटोही फेकण्यात आलं. उस्मानिया विश्वविद्यालयातील जेएसी कार्यकर्त्यांनी अल्लुच्या घराबाहेर आंदोलन केल्याची माहिती आहे.