सोलापूर
शेळगीतील तरुणी फसली आणि…
सोलापूर (प्रतिनिधी) मधला मारुती सोलापूर ते कौतम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत गर्दीमध्ये कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी शुभांगी किरण बलसुरे (वय-२५, रा. कुमारस्वामी नगर, शेळगी) यांच्या जवळील पर्समध्ये ठेवलेला बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. ही घटना १ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान मधला मारुती येथे घडली. याप्रकरणी शुभांगी बलसुरे यांनी आता जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवशरण हे करीत आहेत.