क्राईम

भरधाव कार बनली चिमुकल्याचा काळ

राज्यात एका चार वर्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्याला चिरडले. मुंबईतील वर्दळीचा भाग असलेल्या वडाळा येथे हा अपघात झाला. पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. त्याचे वय अवघे १९ वर्षे आहे. आंबेडकर महाविद्यालयाजवळ आज सकाळी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष लक्ष्मण किनवडे (वय ४) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर भूषण गोळे (वय १९) असे आरोपी कार चलकाचे नाव आहे. गोळे हा त्याची कार रिव्हर्स घेत होता. यावेळी रस्त्यावर खेळत असणाऱ्या आयुषला आरोपीने चिरडले. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. 

आरोपी गोळे विलेपार्ले येथील रहिवासी आहे. अपघाताच्या वेळी चालक दारूच्या नशेत होता का ? याचा तपास पोलिस अधिकारी करत आहेत. 

Related Articles

Back to top button