बिग ब्रेकिंग! पालकमंत्रिपदाचेही ठरले
हिवाळी अधिवेशनाची सांगता होण्यापूर्वीच रात्री उशीरा खातेवाटप करण्यात आले. आता पालकमंत्रीपदाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. महायुतीतील दिग्गजांची रस्सीखेच पाहता, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीसही उशीर होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, आता पालकमंत्र्यांची यादी कधी जाहीर होणार, याबाबत पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी थेट तारीखच सांगून टाकली आहे.
पालकमंत्रीपदाबाबत उशीर होईल का, असा प्रश्न देसाई यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, पालकमंत्री पदाच्या अधिकृत नावाचा अंतिम निर्णय महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून घेणार आहेत. खातेवाटप होईपर्यत चार दिवस, याला हे खाते मिळणार, त्याला ते खाते मिळणार, अशा बातम्या सुरू होत्या. पण खातेवाटप करताना समतोल राखण्यात आला. त्यामुळे जरा धीर धरा, येत्या दोन दिवसांत पालकमंत्रीपदाचे खातेवाटप होईल. आमच्या तीन पक्षात मंत्रीपदावरून कोणतीही रस्सीखेच नव्हती. तसेच पालकमंत्रीपदावरून आमच्यात कोणतीही रस्सीखेच नाही, असेही देसाई म्हणाले.