क्राईम
ब्रेकिंग! परप्रांतीयांची पुन्हा दादागिरी
- अलीकडे कल्याणच्या एका हायप्रोफाईल सोसायटीत मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचा प्रकार उघड झाला होता. त्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर पडले. थेट विधानसभेतही या विषयाची चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील या प्रकारानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आता असाच प्रकार कल्याणमध्ये पुन्हा घडला आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला परप्रांतियाकडून बेदम मारहाण झाली आहे.
- कल्याणमध्ये उत्तम पांडे नावाच्या परप्रांतिय इसमाने एका मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत मराठी तरुण, त्याची पत्नी व आई गंभीर जखमी झाल्याचे समजते. विशेष म्हणजे मारहाण करण्यात आलेला तरुण हा पोलिस दलात सेवेत आहे. या प्रकरणात उत्तम पांडे व त्याच्या पत्नीचाही मारहाण करण्यात सहभाग असल्याचे सीसीटीव्ही फुटेवरुन समोर आले आहे. मानपाडा पोलिसांत या प्रकारणानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- या घटनेत एका चार वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला होता, अशी माहिती आहे. या प्रकाराचा जाब पांडे कुटुंबियांना विचारायला गेलेल्या मराठी कुटुंबाला ही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मानपाडा पोलिसांनी पांडे पती-पत्नीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.