महाराष्ट्र

नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे आदेश

  • चीनमध्ये ‘एचएमव्हीपी’ या विषाणुने डोकं वर काढले असून त्याठिकाणी रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या संबंधीचे अनेक व्हिडिओ आणि बातम्या माध्यमांतून समोर येत आहेत. 
  • दरम्यान राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन पध्दतीने संवाद साधणार आहेत.
  • शंभर दिवसात प्राधान्याने करावयाची कामे याबाबत आढावा घेतला जाणार आहे. विभागासोबत आता स्थानिक कार्यालयांना सुद्धा 100 दिवसांचे टार्गेट दिले जाणार असल्याची माहिती आहे. आपल्या वेबसाईट सुसज्ज करा, माहिती अधिकारात मागितली जाते, अशी सर्व माहिती त्यावर आधीच टाका, ती संकेतस्थळे सायबरदृष्ट्या सुरक्षित करा.
  • कार्यालयांची सफाई करा, अनावश्यक कागदांचे ढीग रिकामे करा. वाहनांचे भंगार साफ करा. कार्यालय स्वच्छ ठेवा. पिण्याचे पाणी, सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांच्या सरप्राइज भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे. इज ऑफ लिव्हिंग लक्षात घेता किमान 2 सुधारणा, नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.

Related Articles

Back to top button