क्राईम
बिग ब्रेकिंग! संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या एकालाही सोडणार नाही

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशमुख कुटुंबियांना दिले आहे. देशमुख कुटुंबियांनी आज फडणवीस यांनी भेट घेतली. आम्हाला न्याय मिळावा, अशी भूमिका देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
कितीही मोठा व्यक्ती असो पण त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. या प्रकरणात जेवढ्या FIR झाल्या त्या सगळ्या आम्ही मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. संबंधित सर्व आरोपींच्या CDR चा तपास व्हावा. यावर फडणवीस यांनी देशमुख कुटुबियांना आश्वासन देत यामध्ये जो कुणी आरोपी असतील त्यांच्यावर कडक शासन होईल, अशी कारवाई करू की पुढे जाऊन एक उदाहरण बनेल, असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी देशमुख यांना दिले.



