मनोरंजन

प्राजक्ता माळीच्या मदतीला गौतमी पाटील धावली

  • मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याकांड प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. विरोधकांसह भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणावरुन धनंजय मुंडेंना टार्गेट केले आहे. बीडमधील गुन्हेगारीबाबत बोलताना धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेत टीका केली होती. यावरुन राजकारण रंगत असतानाच आता लावणी कलाकार गौतमी पाटीलनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
  • कलाकार हा कलाकार असतो. त्याचे नाव कुणासोबत जोडून त्याची बदनामी करणे चुकीचे आहे. प्राजक्ताने घेतलेली भूमिका योग्य असून आपण तिच्या भूमिकेचे समर्थन करतो, असे म्हणत नृत्यांगणा गौतमीने प्राजक्ताची पाठराखण केली. तसेच तिने ट्रोलर्सनांही खडेबोल सुनावले आहेत.
  • मलाही याआधी अशाच प्रकारे ट्रोल केले गेले होते, मात्र मी खचून गेली नाही. त्यामुळे प्राजक्ता ताईनेही खंबीरपणे उभे राहून आपली कला सादर करत राहावी आणि हसत राहावे, असेही गौतमी म्हणाली. 

Related Articles

Back to top button