लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव का झाला?
लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत पंकजा यांना केवळ साडे सहा हजारांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवावर बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.
धस यांनी पंकजा लोकसभा निवडणुकीत नेमक्या कशा पडल्या? तसेच पंकजा यांना कोणी पाडले? याची माहिती दिली आहे. बीड जिल्ह्यात धनंजय मुंडेंपेक्षा आकाची म्हणजेच वाल्मिक कराडची दहशत जास्त आहे. त्यामुळे आकाने धनंजय मुंडेंवर पूर्ण वशीकरण केले आहे.
धस म्हणाले की, मंत्री मुंडेंचा मित्रच वाल्किमने शिल्लक ठेवला नाही. तसेच त्याने बरोबर सगळ्यांचे काटे काढले आहेत. तसेच बजरंग सोनवणे आणि मुंडे हे प्रचंड चांगले मित्र होते. मात्र या दोघांच्या मित्रत्वाचे वाटोळे हे विष्णु चाटे आणि वाल्मिक या दोघांनी केले आहे. तेव्हापासून बजरंग हे धनंजय यांच्या विरोधात गेला. तसेच बजरंग बाप्पा जर विरोधात गेले नसते तर पंकजा लोकसभेला पडल्याच नसत्या, असा खळबळजनक खुलासा धस यांनी केला आहे.