बिजनेस
खुशखबर ! सोन्याच्या दरात घसरण

- गेल्या आठवड्यात सोन्याने ग्राहकांचा खिसा चांगलाच खाली केला होता. सोन्याने सोळाशे रुपयांची रॉकेट भरारी घेतली. तर काल किमतीमध्ये कोणताच बदल दिसला नाही. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत.
- गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,300 रुपये प्रति दहा ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,860 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. चांदीने देखील या आठवड्यात आनंदवार्ता दिली. 3 जानेवारी रोजी चांदीने दोन हजारांनी उसळली घेतली. तर चार जानेवारीला एक हजारांनी किंमत उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव सध्या 91,500 रुपये इतका आहे.
- इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 77,161, 23 कॅरेट 76,852, 22 कॅरेट सोने 70,680 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट सोने आता 57,871 रुपये, 14 कॅरेट सोने 45,139 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले आहे.