देश - विदेश
ब्रेकिंग! जमीन, आकाशानंतर आता भारताचा समुद्रामार्गे हल्ला

- भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. मात्र त्यानंतर संतापलेल्या पाकिस्तानकडून कारवाया कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे आता भारताची थ्री डायमेन्शनल फोर्स अर्थात हवाई दल, लष्कर आणि नौदल हे तिन्ही सज्ज झाले आहेत. पाकिस्तानने गुरुवारी पुन्हा एकदा एफ-16, जेएफ-17 चे दोन विमान आणि 8 ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचे एफ-16 आणि दोन जेएफ-17 विमाने पाडली, तर भारताच्या एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानची 8 ड्रोन हवेतच नष्ट करत मोठे नुकसान टाळले आहे. यानंतर आता पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदलाचे वेस्टर्न नेव्हल कमांड सक्रिय झाले होते.
- पाकिस्तानच्या कराची बंदराच्या परिसरात आयएलएस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या दोन युद्धनौका तैनात होत्या. पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर या दोन्ही युद्धनौकांनी कराची बंदरावर हल्ला चढवला आहे. कराची बंदरावर जवळपास अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. त्यामुळे दोन्ही बंदरांवर मोठी आग लागली. या हल्ल्यामुळे दोन्ही बंदर शहरांमध्ये धुराचे लोट पसरले आहेत. अहवालानुसार, पाकिस्तानी नौदलाचे कराची आणि ओरमारा येथे तळ आहेत. जिथे त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांचे मुख्यालय, युद्धनौका आणि पाणबुड्या तैनात आहेत. या दोन नौदल तळांना उद्ध्वस्त करून आयएनएस विक्रांतने पाकिस्तानी नौदलाला मोठ्या प्रमाणात हादरवून टाकण्यात यश मिळवले आहे.