देश - विदेश
मोठी बातमी! भारताकडून पाकिस्तानवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव

- पाकिस्ताने भारतात हल्ले केल्यानंतर भारतीय सैन्याने थेट पाकिस्तानात घुसून जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. लाहोर, कराची, सियालकोटसह राजधानी इस्लामाबाद शहरात तुफान हल्ले सुरू केले आहेत. आताच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर मोठा स्फोट झाला आहे. दरम्यान शाहबाज शरीफ हे बंकरमध्ये लपले आहेत. याआधी भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त करुन टाकली. मिसाइल्सही नष्ट केल्या. आतापर्यंत पाकिस्तानच्या 50 मिसाइल्स नष्ट करण्यात आल्या आहेत.
- पाकिस्तानने भारतावर हल्ले केल्यानंतर भारताने दमदार काउंटर अटॅक सुरू केला आहे. लाहोर, कराची शहरांवर तुफान हल्ले सुरू केले आहेत. तसेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू केला आहे.



