ही तर फक्त सुरुवात, ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचा मोठा इशारा

Admin
1 Min Read
  • भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावात मोदी सरकराने लष्कर प्रमुखांना विशेष अधिकार दिले आहेत. याबाबतचे नोटिफिकेशनदेखील जारी करण्यात आले आहेत. या निर्णयानंतर आता गरज पडल्यास लष्करप्रमुख प्रादेशिक सैन्याला (टेरिटोरियल आर्मी) मदतीसाठी बोलवू शकणार आहेत. १९४८ च्या प्रादेशिक सैन्य नियमांनुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे आणि ६ मे रोजी द गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अधिसूचनेद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. हा आदेश १० फेब्रुवारी २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२८ पर्यंत तीन वर्षांसाठी लागू राहील.
  • प्रादेशिक सैन्य ही एक अशी सेना आहे ज्यामध्ये सामान्य नागरिकदेखील सामील होऊ शकतात, जे सहसा इतर नोकऱ्या करतात. परंतु गरज पडल्यास त्यांना देशाची सेवा करण्यासाठी बोलावले जाऊ शकते. हे सैनिक सहसा देशाची अंतर्गत सुरक्षा, नैसर्गिक आपत्ती, आपत्कालीन परिस्थिती इत्यादी परिस्थितीत मदत करण्यासाठी तैनात केले जातात. दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींचं पाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे. ही तर फक्त सुरुवात, दीर्घकाळासाठी तयार राहा, असे मोदी म्हणाले.
Share This Article