खेळ

ब्रेकिंग! भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित

  • भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल २०२५ चे आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आजपासून आयपीएल १८ च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही. बीसीसीआयने याची अधिकृत माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर आजपासून आयपीएल १८ च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही.
  • आयपीएलच्या चालू हंगामात एकूण ५७ सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, ५८ वा सामना काल धर्मशाळामध्ये सुरू होता. पण पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर हा सामना मध्येच थांबवण्यात आला. यंदाच्या हंगामात एकूण ७४ सामने खेळवले जाणार होते.
  • २५ मे रोजी कोलकाता येथे अंतिम सामना खेळवला जाणार होता. पण, आता भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव लक्षात घेता बीसीसीआयने यंदाचे आयपीएलचे सर्व उर्वरित सामने अनिश्चितकाळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Back to top button