- पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. या ऑपरेशन सिंदूरवर जागतिक स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच टेनिस स्टार सानिया मिर्झाची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिने सोशल मीडियावर भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या पत्रकार परिषदेतील एक फोटो शेअर केला आहे.
- मंगळवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत झालेल्या कारवाईनंतर बुधवारी सकाळी भारताच्या परराष्ट्र सचिवांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंहसुद्धा उपस्थित होत्या. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सैन्यदल आणि वायुसेनेचे संयुक्त अभियान होते. सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी ऑपरेशनबद्दलची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्याचा फोटो शेअर करत सानियाने लिहिले, या अत्यंत पॉवरफुल फोटोमध्ये परफेक्ट संदेश देण्यात आला आहे की, एक देश म्हणून आपण काय आहोत. सानियाची ही पोस्ट क्षणार्धात व्हायरल झाली आणि नेटकऱ्यांनी तिचेही कौतुक केले.
ऑपरेशन सिंदूरवर सानिया मिर्झाची बेधडक पोस्ट
