- भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर केले. त्यानुसार पाकिस्तानच्या अनेक शहरांवर भारताने ड्रोन हल्ले केले. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. कराचीपासून ते अगदी इस्लामाबादपर्यंत पाकिस्तान भारताच्या कारवाईने हादरला आहे. या जोरदार कारवाईमुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची झोप उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद हा भारताच्या एअर स्ट्राईकमुळे घाबरून कराची सोडून पळून गेला आहे. दाऊदसोबत त्याचे साथीदार अनिस आणि छोटा शकील यांनीही कराची सोडले आहे.
- भारताच्या लष्करी कारवाईमुळे दाऊद इब्राहिम आपल्या साथीदारांसह जीव वाचवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला आहे. त्याने कराचीतून पळ काढला आहे. त्याला कराचीतून बाहेर काढण्यामागे आयएसआय असल्याचेही म्हटले जात आहे.
- त्याला पाकिस्तानमध्येच दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहितीही मिळत आहे. दाऊदचे संपूर्ण परिवार या हल्ल्यामुळे घाबरला आहे. त्यात पत्नी महजबीन, मुलगा मोईन, त्याचा छोटा भाऊ अनिस इब्राहीम, दाऊदचा डावा हात छोटा शकील यांच्यासह त्याने कराची सोडले आहे. शिवाय दाऊदचा खास शुटर मुन्ना झिंगाडा ही दाऊद बरोबर आहे.
ब्रेकिंग! भारताच्या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिमची झोप उडाली
