भारताने बुधवारी चंद्रावर इतिहास रचला. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगमुळे भारताने जगात यशाचा झेंडा फडकवला आहे. इस्रोला मिळालेले हे सर्वात जबरदस्त यश आहे.
मिशन चांद्रयान-3 वर केवळ भारताच्याच नाही तर जगभरातील वैज्ञानिकांसह सर्वसामान्यांच्या नजरा खिळल्या होत्या. चांद्रयान चंद्रावर उतरण्याची वेळ जसजशी जवळ येत होती, तसे लोकांच्या हृदयाचे ठोकेही वाढत होते.
देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक ‘मून मिशन’च्या यशासाठी मंदीर, मशीद, गुरुद्वारासह सर्वच ठिकाणी प्रार्थना करत होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग मधून इस्त्रोशी जुडलेले होते. चांद्रायनाने चंद्रावर अगदी यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर मोदींनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांसह समस्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता इस्रोने पुढील मोहीम हाती घेतली आहे. यापुढे चंद्राच्या अभ्यास होणार आहे. चंद्राच्या विविध ठिकाणच्या भागात अभ्यास होईल. इतकेच नव्हे तर इस्रो सूर्याचा आणि शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह पाठवणार आहे. दरम्यान सोलापुरात चांद्रयान-3 च्या यशाचे कौतुक झाले.