देश - विदेश
दुचाकी वाहनासाठी नवीन नियम, आता दोन हेल्मेटची सक्ती

- देशातील दुचाकी वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. दुचाकी वाहनासाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता दोन हेल्मेटची सक्ती होणार आहे. लवकरच दुचाकी वाहन उत्पादकांना वाहन विक्री वेळी खरेदीदारांना दोन हेल्मेट देणे अनिवार्य करण्यात येणार आहे. रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि तरुणांनी हेल्मटे घालावे यासाठी जागरुकता आणण्यात येणार आहे. दोन हेल्मेट जर मिळणार असेल तर दुचाकीस्वार आणि त्याच्या मागील प्रवाशालासुद्धा हेल्मेट घालणे सक्तीचे होणार हे नक्की आहे. याविषयीची अधिसूचना आली आहे.
- केंद्र सरकारने दुचाकी वाहन निर्मिता करणाऱ्या कंपन्यांसाठी नवीन अधिसूचना लागू केली आहे. दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट देने अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन नियमांसाठी केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले आहेत. अंतिम अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर तीन महिन्यातच नवीन नियम अनिवार्य होतील. त्यानंतर रस्त्यावर दुचाकी चालक आणि दुचाकीस्वार यांनासुद्धा हेल्मेट वापरणे सक्तीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात 1 जानेवारी 2026 पासून नवीन L2 श्रेणीतील दुचाकी वाहने, ज्यामध्ये 50 सीसी हून अधिक इंजिन क्षमता वा 50 किमी / प्रति तासाहून अधिक गती असलेल्या मोटरसायकल आणि स्कूटरला आता अँट-लॉक ब्रेकिंग सिस्टीम ABS लावावे लागेल. त्यामुळे अपघातातून मोठे नुकसान होणार नाही.
- दरम्यान या नियमांना अंतिम रूप देण्यापूर्वी परिवहन मंत्रालयाने देशभरातून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या काळात दुचाकीस्वार त्यांच्या हरकती आणि सूचना परिवहन मंत्रालयाला comments-morth@gov.in या ईमेलवर कळवू शकतील. भारतात दरवर्षी दुचाकी वाहनांच्या अपघातांची संख्या मोठी आहे. दोन हेल्मेटमुळे आता वाहन चालक आणि पाठीमागे बसलेल्या प्रवाशाला हेल्मेट घालावे लागेल.



