राजकीय

मोठी बातमी ! भाजपचा शिंदे गटावर सर्जिकल स्ट्राईक

  • शिंदे गट शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यातील कायदेशीर पेच कायमच आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले असले तरी हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरणही विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आगामी काळातील राजकारण या दोन्ही निकालांवर असणार आहे.
    भविष्यात काही तांत्रिक अडचण आलीच आणि आमचे नेते, मुख्यंमत्री शिंदे यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला मान्य असेल, असे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले आहे. पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
    पाटील यांनी म्हटले की, सध्या शिंदे गटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. परिणामी कोणतीही कायदेशीर अडचण आमच्या आमदारांना येणार नाही. पुढची निवडणूक आम्ही धनुष्यबाण चिन्हावरच लढू.
    पण समजा काही तांत्रिक अडचण आलीच तर मुख्यंमत्री शिंदे यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर, तो आम्हाला मान्य असेल. पक्षात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शिंदे यांनाच आहे, असे पाटील यांनी सांगितले आहे.
    राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गटाच्या काही आमदारांना अपात्र ठरवू शकतात. मात्र, या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांची आमदारकी आणि पुढील अपात्रताही वाचू शकते. परिणामी शिंदे गटाचे आमदार कमळ चिन्हावर निवडणूक लढवू शकतात.

Related Articles

Back to top button