राजकीय

ब्रेकिंग! ठाकरे गटाला नवा झटका

मोदी सरकार विरोधात विरोधकांनी काल संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला. त्यावर मतदानही झाले. हा अविश्वास ठराव फेटाळून लावण्यात आला. या अविश्वास ठरावाचा मोदी सरकारवर काहीच परिणाम झाला नाही. असे असले तरी, ठाकरे गटावर मात्र, या अविश्वास ठरावाचा उलट परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. 

या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट शिवसेनेने ठाकरे गटाच्या खासदारांना व्हीप बजावला होता. हा व्हीप ठाकरे गटाच्या खासदारांनी पाळला नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई होणार आहे. शिंदे गटाच्या खासदारानेच तसा दावा केला आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा नवा धक्का मानला जात आहे.
शिंदे गट शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांनीच ठाकरे गटाच्या पाच खासदारांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभेचा अविश्वास ठराव आला, त्याच दिवशी शिवसेनेच्या खासदारांना व्हीप पाठवला होता. मतदानावेळी केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा रिमायंडर व्हीप ठाकरे गटाच्या खासदारांना पाठवला होता. लोकसभेत शिवसेनेचे ५ खासदार अनुपस्थित होते. त्यांच्यावर कारवाई होईल. सोमवारी वकिलांशी चर्चा करून त्या सदस्यांना आम्ही नोटीस देणार आहोत. 
लोकसभेत शिवसेनेचा एकच गट मानला जातो. परिणामी भावना गवळी यांचाच व्हीप लागू होतो, असे शेवाळे यांनी सांगितले. दरम्यान शिंदे गटाचे सर्व आमदार आणि खासदार कमळाच्या चिन्हावर निवडणुका लढवणार असल्याची चर्चाही त्यांनी फेटाळून लावली. अशी कुठलीही चर्चा नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे यावर चर्चा होण्याचा प्रश्नच नाही, असेही शेवाळे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button