महाराष्ट्र
पुण्यातील नाना पेठेत 300 जणांचे रक्तदान

पुणे : नाना पेठ नवा वाडा येथील कैलासवासी अक्षय वल्लाळ यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराला रास्ता पेठ येथील ओम ब्लड बँकमधील डॉक्टर नर्स यांचे सहकार्य लाभले. तसेच या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी पुढे येऊन रक्तदान केले. सुमारे 300 जणांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले रक्तदात्यांना आकर्षण भेटवस्तू व अल्पउपहाराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे आयोजन नवा वाडा मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले होते.