राजकीय

ब्रेकिंग! अजितदादांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू

  1. आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांच्या तोंडावर आलेल्या असताना राजकीय उलथापालथी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच आता कॉंग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांने राज्यातील राजकारणावर भाष्य करीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री ( CM)बनविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे म्हणताच मोठी खळबळ उडाली आहे.
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून उपमुख्यमंत्री अजितदादा यांना CM पदी बसविण्याचा भाजपाचा डाव असल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. म्हणूनच शिंदे आजारी असल्याचा बनाव करण्यात येत आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
    गेल्या काही दिवसांपासून शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाकडून याचे खंडन करण्यात आले होते. आज पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात आले आहे.

हा सर्व प्रकार म्हणजे भाजपाचा डाव असून शिंदेंना आजारी करून अजितदादा यांना  CM करण्याच्या हालचाली सुरू आहे. शरद पवार आणि अजितदादा यांच्यात याच पार्श्वभूमीवर भेट झाली, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. अजितदादा यांच्या भेटीबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यास लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

Related Articles

Back to top button