खेळ
ऋषभ पंत वनडे वर्ल्डकप खेळणार का?

भारतीय फलंदाज ऋषभ पंत महत्वाच्या क्रीडा स्पर्धांना मुकण्याची शक्यता आहे. पुढील ६ महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहणार आहे. पंत यापूर्वीच आयपीएलसह अनेक क्रिकेट स्पर्धांना मुकला आहे. कार अपघातात पंत गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्यावर मुंबईतील अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीसीसीआय जारी केलेल्या मेडिकल अपडेटमध्ये म्हटले आहे की, पंतच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यावर दोन सर्जरी झाली आहेत. तिसरी सर्जरी ६ आठवड्यानंतर होणार आहे. त्यामुळे आगामी सहा महिने पंत क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करू शकणार नाही. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकातूनही ऋषभ बाहेर पडू शकतो.