सोलापूर
सोलापूर! ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेला यण्णीमज्जनाने सुरुवात

सोलापूरच्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यात पारंपरीक प्रथेनुसार विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या कुटुंबियांनी नंदी ध्वजाचे पूजन करून दर्शन घेतले.
यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, राहुल वर्धा, केदार उंबरजे, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, अंबादास गुत्तिकोंडा, सुनील सारंगी, यांच्यासह इतर मान्यवर, हजारो भाविक भक्त उपस्थित होते.
हे नंदिध्वज शहराच्या पंचक्रोशीत ती नियोजित मार्गाने सिद्धेश्वर मंदिरात जाईल. तेथून नंदीध्वजांची मिरवणूक 68 लिंगांना तैलाभिषेक कार्यक्रम होईल.