शिंदेंना टक्कर द्यायला नवे ठाकरे मैदानात ?

शिवसेना सध्या खडतर मार्गावरुन मार्गक्रमण करते आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केले. शिवसेना नेतृत्व आणि संपूर्ण पक्षासह राज्याच्या राजकारणालाही हा मोठा धक्का होता. या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि चिरंजीव आदित्य ठाकरे सक्रीय झाले. दरम्यान उद्धव आणि आदित्य यांच्यासोबतच तेजस ठाकरे हेसुद्धा राजकारणात एन्ट्री करणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ही चर्चा नेहमीच होत असते. मात्र, मुंबईत झळकलेल्या एका पोस्टरमुळे या चर्चेला बळ मिळाले आहे.
गिरगाव परिसरात शिवसेना पदाधिकाऱ्याकडून झळकलेल्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टरवर तेजस यांचा फोटो आणि आजची शांतता, उद्याचे वादळ… नाव लक्षात ठेवा, तेजस उद्धव ठाकरे असे शब्द अधिक उठावदार टाईपमध्ये लिहीली आहेत. हे शब्द आणि पोस्टर पाहणाऱ्यांच्या लगेच नजरेत भरत आहे. त्यामुळे पोस्टर पाहून उपस्थितांमध्ये चर्चा होत आहे.