सोलापूर

…तर शिंदे सरकार नक्कीच पडेल

पक्षांतर बंदी कायदा एकदम स्पष्ट आहे. त्यामुळे १६ बंडखोर आमदारांवर कारवाईची केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयात मान्य झाल्यास हे सरकार नक्कीच पडेल, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

दानवे म्हणाले, पक्षांतर बंदी कायदा एकदम स्पष्ट आहे. त्या आधारावरच १६ आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाचा निकाल आला तर हे सरकार नक्कीच पडेल. मुळातच हे सरकार असंविधानिक आहे. त्यामुळे ते निश्चितच पडेल.
सतत सुरू असलेल्या तारीख पे तारीख यावरुन अनिल कपूरच्या मेरी जंग या चित्रपटाची आठवण झाली. सर्व परिस्थिती समोर आहे. पक्षांतर बंदीचा कायदा आहे. आयोग काय बोलते हे समोर आहे. निदान फेब्रुवारीच्या १४ तारखेला तरी कोर्ट निर्णय देईल, असे मत दानवे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button