देश - विदेश
मुलींना माल, आयटम म्हणाल तर होणार थेट तुरुंगवास

मुलींची किंवा महिलांची छेड काढणाऱ्या रोड रोमिओना आता चाप बसणार आहे. रस्त्यावर ये जा करणाऱ्या मुलींना किंवा महिलांना छेडणाऱ्या तरुणांना आता जबर शिक्षा केली जाणार आहे.
जर एखाद्या मुलीला माल, छम्मक छल्लो किंवा आयटम म्हटल्यास तीन वर्षाची जेलची हवा खावी लागणार आहे.
राष्ट्रीय अन्वेषण ब्युरोने हा इशारा दिला आहे. देशात छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. तरुणांचे धाडस वाढत आहे. याला अटकाव घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
महिलांची छेड काढल्यास किंवा अश्लील इशारे केल्यास तीन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा आर्थिक दंडाची तरतूद आहे. दरम्यान ब्युरोच्या निर्णयाबद्दल अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तीन वर्षांनी काय होणार आहे. मुलींचे आयुष्य बरबाद करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी, असेही काहींचे म्हणणे आहे.