सोलापूर

निवडणूक निकालानंतर प्रचंड हाणामारी; दगडफेकीत भाजप कार्यकर्ता ठार

आज सुमारे 7000 ग्रामपंचायतीचा निकाल लागत आहे. रविवारी यासाठी मतदान झाले होते. आता हळूहळू निकालाचे कल समोर येत आहेत. या निकालाच्या प्रक्रियेला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एका ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर प्रचंड हाणामारी झाली.

टाकळी खुर्द या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उभे होते. गावातील धनराज माळी यांचा भाऊ जितेंद्र हा सरपंच पदासाठी निवडणुकीत उभा होता. निवडणुकीतील विजयानंतर धनराज हा गावातील देवीच्या दर्शनासाठी जात होता. याच वेळी विरोधी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. दगडफेकीत 32 वर्षीय धनराजचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी या घटनेत सुमारे 25 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. वरील घटनेत प्रचंड हाणामारी देखील झाली.

Related Articles

Back to top button