बहुत बढिया ! अवघ्या 24 व्या वर्षी तपस्या जंगम बनली सरपंच

Admin
1 Min Read

राज्यातील विविध ग्रामपंचायतीचा निकाल समोर येत असून काही लढती महत्त्वाच्या ठरल्या. या ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले होते. आता निकाल ही जाहीर होत आहेत. मात्र एका तरुणीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

कारण वयाच्या केवळ 24 व्या वर्षी ही तरुणी सरपंच बनली आहे. तपस्वी जंगम असे या तरुणीचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील दासगाव येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तपस्या उभी होती.
या निवडणुकीत ती जिंकूनही आली आहे. अत्यंत तरुण सरपंच म्हणून तिचा उल्लेख केला जात आहे. या निवडणुकीतील महाविकास आघाडीकडून उभी होती. राजकारणाचा कुठलाही अनुभव नसताना तिने हा विजय खेचून आणला.
तपस्याने अलीकडेच हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळविली आहे. गावच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच आपण राजकारणात उतरल्याचे तपस्याने सांगितले. तिच्या विजयानंतर गावात मोठा जल्लोष करण्यात आला. तपस्याचा हा विजय युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

Share This Article