चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले गडकरी
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी खानपानचे शौकीन आहेत. गडकरी हे शुद्ध शाकाहारी असून, ते बऱ्याचदा विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये जातात. गडकरी यांना चविष्ट पदार्थ खायला आवडते. गडकरींना भारतीय पदार्थांशिवाय चायनीज फूडही खायला प्रचंड आवडते.
याच चायनीज फूड खाण्यावरून गडकरींसोबत एक किस्सा घडला होता, हा किस्सा गडकरींनी एका कार्यक्रमात सांगितला. तो किस्सा म्हणजे चायनीज खाताना त्यांनी एका शेफला सहज त्याचा पगार विचारला आणि त्याने दिलेले उत्तर ऐकताच गडकरी अचंबित झाले.
गडकरी यांनी सांगिले होते, की ते जेव्हा जेव्हा मुंबईत असतात, तेव्हा तेव्हा शाहरुख खानच्या घराशेजारी असलेल्या ‘ताज लँड्स एंड’ हॉटेलमध्ये नक्की जातात. शिवाय, ‘ताज लँड्स एंड’मध्ये चायनीज रेस्टॉरन्ट आहे. अनेक वेळा तेथेही जात असतो. त्या रेस्टोरन्टमध्ये डेव्हिड नावाचा एक शेफ होता. त्या शेफने मला ओळखले आणि तो माझ्याकडून फिडबॅक घेत होता.
गडकरींनी त्याला सहज विचारले की, डेविड तू मुळचा कुठला? या प्रश्नावर त्याने उत्तर दिले की, मी हाँगकाँगचा आहे. हे ऐकून गडकरी चकित झाले.
गडकरी यांनी त्या शेफला विचारले, की तू येथे कुठे राहतोस? तो म्हणाला हॉटेलमध्येच वर एक रूम मिळाली आहे. त्यानंतर गडकरींना त्याला त्याची सॅलरी विचारली, यावर तो जड अंतःकरणाने म्हणाला, फार नाही फक्त 15 लाख. शेफचे उत्तर ऐकताच गडकरींच्या भूवया उंचावल्या आणि त्यांना विचारले फक्त 15 लाख?…