राजकीय

ब्रेकिंग! राज्यात एमआयएमचा डाव फसला; 44 वरून यंदा अवघ्या 14 जागांवर

  • सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांपैकी कोणकोणते उमेदवार उभे राहणार याची जेवढी उत्सुकता असते तेवढीच ती छोट्या पक्षांबाबतही असते.
  • अशातच गेल्या दोन निवडणुकांमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाची देखील चांगलीच चर्चा होती. त्यामुळे यंदा देखील एमआयएम काय भूमिका घेणार, की विरोधी पक्ष – मविआ सोबत जाणार याची उत्सुकता होती. 
  • मुस्लिम मते मिळावीत आणि अधिकाधिक राज्यात पक्षाचा विस्तार व्हावा, या उद्देशाने असदुद्दीन ओवेसी यांनी एमआयएम पक्ष हैदराबादमधून बाहेर काढून महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा आपले उमेदवार उतरवले. 
  • या पहिल्याच प्रयत्नात ओवेसी यशस्वी झाले आणि महाराष्ट्रात त्यांनी दोन जागा जिंकल्या. एवढेच नाही तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी लोकसभेची देखील एक जागा जिंकली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओवैसी यांनी सर्वाधिक म्हणजे 44 उमेदवार उभे केले होते. त्यामुळे, यावेळी देखील ते जास्तीतजास्त उमेदवार उतरवतील, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्ष जागावाटप समोर आले, तेव्हा अनेकांना धक्का बसला. कारण यावेळी ओवेसींनी अवघ्या 14 जागांवर उमेदवार दिले आहेत. आपला हात आखडता घेतला आहे.
  • विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी एमआयएमने केवळ 14 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यात औरंगाबाद पूर्वमधून माजी खासदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबाद मध्यमधून नासिर सिद्दीकी, धुळे शहरातून फारुख शाह अन्वर, मालेगाव मध्यमधून मुफ्ती इस्माईल कासमी, भिवंडी पश्चिममधून वारिस पठाण, भायखळामधून फैयाज अहमद खान, मुंब्रा कळव्यातून सैफ पठाण, वर्सोवा येथून रईस लष्करिया, सोलापूरमधून फारूख शाब्दी, मिरजमधून महेश कांबळे (SC), मूर्तिजापूरमधून सम्राट सुरवाडे (SC), कारंजा मानोरामधून मोहम्मद युसूफ, नांदेड दक्षिणमधून सय्यद मोईन आणि कुर्लामधून बबिता कानडे (SC) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
  • 2019 च्या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांनी 44 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, तर 2014 च्या निवडणुकीत 24 जागांवर निवडणूक लढवली होती.

Related Articles

Back to top button