राजकीय
ब्रेकिंग! मुख्यमंत्रीपदाबाबत अजितदादांचे महत्वाचे विधान

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काटेवाडी येथे मतदान केल्यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केले. अजितदादा म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही सर्व निवडून आलेले आमदार व नेते एकत्र बसून चर्चा करू. या चर्चेतून मुख्यमंत्र्याची निवड करू. लोकसभा निवडणुकीतही आमच्याच कुटुंबातील दोन लोक एकमेकांच्या विरोधात उभे होते. ती निवडणूक सर्वांनी पाहिली आहे. यावेळीही ते घडले आहे, मला विश्वास आहे की, बारामतीची जनता मला विजयी करेल.