राजकीय

काँग्रेसला मोठा हादरा बसणार; माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या वाटेवर

काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशमध्ये देखील मोठा झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपाच्या वाटेवर आहेत. लवकर ते भाजपामध्ये प्रवेश करतील.
आता कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ याने आपल्या एक्स अकाउंटवरून काँग्रेस पक्षाचे नाव हटवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेता वी.डी. शर्मा यांनी एक मोठे विधान केले आहे. काँग्रेसमधील अडचणीत असलेल्या नेत्यांसाठी आमचे दरवाजे सदैव खुले आहेत, असे शर्मा यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, अयोध्येतील रामलल्ला यांच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ कार्यक्रमाचे निमंत्रण हायकमांडने नाकारल्याने काँग्रेसचे अनेक नेते नाराज असल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे.
दरम्यान कमलनाथ यांनी भाजप प्रवेशाची शक्यता थेट नाकारली नाही. याबाबत शक्यता नाकारण्याचा प्रश्नच नाही. माध्यमांचे प्रतिनिधी उत्साहित होत आहेत. माझा पक्ष बदलाचा काही विचार असेल तर मी तशी माहिती देईल, असे कमलनाथ यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button