राजकीय
मोदींच्या ‘त्या’ भेटीनंतर उद्धव ठाकरेंना फुटला होता घाम

शिंदे गटाचे अधिवेशन कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आले असून, आज या अधिवेशनाच्या समारोपीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
जे आज वारसा सांगतात त्यांनी आधी आरसा बघावा, अशा शब्दांत त्यांनी उद्धव यांच्यावर टीका केली. शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे जसे दिसतात तसे नाहीत. ते म्हणतात ना एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग त्याप्रमाणे एका चेहऱ्यामागे अनेक मुखवटे घालून ते फिरतात. ते दिसतात तसे इनोसंट नाहीत, त्यामागे अनेक चेहरे आहेत.
शिंदे पुढे म्हणाले की, लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असे त्यांनी केले आहे. हे मी संसदीय शब्द बोलतोय, मी कधीही असंसंदीय शब्द बोलत नाही, हे तुम्हाला नीलम गोऱ्हे सांगतील.
उद्धव ठाकरे मविआसोबत दिल्लीला गेले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला. तेव्हा एकटेच गेले. केबिनमध्ये आणि बाहेर आल्यावर घाम फुटला होता. दोन ग्लास पाणी प्यायले होते. हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितले, असा किस्सा त्यांनी सांगितला.



