मनोरंजन

मुलींच्या तस्करीचे भयानक वास्तव

‘भक्षक’ या चित्रपटात मुलींच्या तस्करीचे कथानक पाहायला मिळाले आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर एका पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाचे कथानक पाहून अभिनेत्री प्राजक्ता माळी भारावून गेली आहे.
प्राजक्ता हिने देखील नुकताच ‘भक्षक’ हा चित्रपट पाहिला आहे. ‘भक्षक’ हा चित्रपट पहिल्यानंतर आता प्राजक्ताने एका बालिका आश्रमाला भेट दिली. या आश्रमाला भेट दिल्यानंतर आता तिने चाहत्यांना देखील एक आवाहन केले आहे.
तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्राजक्ताने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, दोन दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर ‘भक्षक’ सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला.
कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डींगमध्ये, चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये, आपल्या अवतीभवती काय चालू असते, याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. अशाच काही भरकटलेल्या ठिकाणांहून या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होतोय बघून बरे वाटले.
सजगपणे पहा, तुमच्याही अवतीभवती अशा मुली असतील, तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या. विरारमधील या बालिकाश्रमाचा पर्याय तर खूलाच आहे. (राहणे, जेवण, शिक्षण, आरोग्यसुविधा मोफत. – नियम व अटी लागू.) संपर्क – ९८८११५२१३९ – गौतम. भक्षक जरूर पहा, म्हणजे मला नेमकं काय म्हणायचे, हे ध्यानात येईल.

Related Articles

Back to top button