खेळ

ब्रेकिंग! पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा मोठा विजय

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १८८ धावांनी विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्‍या संघाला दुसरा डाव्‍यात ३२४ धावांमध्‍ये गुंडाळले. दोन सामन्‍यांच्‍या कसोटी मालिकेमध्‍ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

२२ डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी बांगलादेशने 6 बाद 272 धावा केल्या होत्या. पाचव्‍या दिवसाच्‍या तिसर्‍या षटकामध्‍येच भारतीय संघाला यश मिळाले. १३ धावांवर खेळत असणार्‍या मेहदी हसन याला सिराजने तंबूत धाडले. बांगलादेशचा दुसरा डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न करणार्‍या शाकिबला कुलदीपने त्रिफळाचीत केले. तो ८४ धावांवर बाद झाला. भारताला पहिली कसोटी जिंकण्‍यासाठी केवळ दोन विकेटसची गरज आहे. 

यानंतर कुलदीपने इबादोत हुसेन याला शून्‍य धावांवर बाद केले. यानंतर अक्षर पटेलने तैजुल इस्‍लाम याला चार धावांवर बाद करत बांगलादेशचा डाव ३२४ धावांवर गुंडाळला. दुसर्‍या डावात फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांची जादू पाहण्‍यास मिळाली. अक्षरने चार तर कुलदीपने तीन विकेट घेतल्‍या.

Related Articles

Back to top button