महाराष्ट्र

Breaking! चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकीची धमकी, पिंपरीतल्या कार्यक्रमात फेसशिल्ड घालूनच आले

  • महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात चंद्रकांत पाटलांवर शाई फेकल्याप्रकरणी आंदोलने करण्यात आली. अशातच आता पाटील यांनी खबरदारीचा उपाय म्हणून चेहऱ्यावर फेस मास्क लावून भाषण केले. पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात पाटलांनी फेस मास्क घातला होता.
  • पाटील यांनी चेहऱ्यावर फेस मास्क लावून पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात भाषण केले. मागील आठवड्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. त्यानंतर ‘आजही पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार’, अशा आशयाची पोस्ट विकास लोले यांच्याकडून करण्यात आली होती. त्यामुळे खबरदारीचा म्हणून पाटलांनी हा उपाय केल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Back to top button